ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान'तर्फे रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान'तर्फे रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा

प्रकाशन: 09 Dec 2021 07:55 PM
वाचन संख्या 34

बांदा /राकेश परब: ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’तर्फे रक्तदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. मित्र किंवा मैत्रिणीला रक्तदानाचे तसेच अवयवदानाचे महत्व सांगणारे पत्र असे विषय यासाठी देण्यात आले आहेत. शालेय गट पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व खुला गट १८ वर्षेवरील असा आहे. पत्र लिहिताना शालेय गटासाठी आंतरदेशीय पत्रावरच लिहिणे आवश्यक आहे. खुल्या गटासाठीचे पत्र आखीव कोऱ्या कागदावर असावे. सुवाच्य अक्षरात हे पत्र लिहावे. पत्राच्या उजव्या कोपरात आपला संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांकासह लिहावा. पत्राच्या सुरुवातीला अगदी वर ‘रक्तदान, अवयवदान जागृती स्पर्धा २०२१’ असे लिहावे. शालेय गटासाठी १००० ते १२०० शब्दमर्यादा आहे. खुल्या गटासाठी १२०० ते २००० शब्दमर्यादा आहे. सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यशस्वीताना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ परितोषके दिली जातील. शालेय गटासाठी प्रमाणपत्र व रोख ५०१, ३०१, २०१ व १०१ रुपये प्रमाणे बक्षिसे दिली जातील. खुल्या गटासाठी प्रमाणपत्र व रोख १५०१, १२५१, ११११ रुपये व ७५१ रुपयेची तीन बक्षीसे दिली जातील. प्रकाश तेंडोलकर, अध्यक्ष, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, सिंधुसदन १२५१, सुळभाटले, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पिन ४१६५११ या पत्त्यावर दिनांक २० डिसेंबरपर्यंत पत्र पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर (मो. ७७२१८५१३०४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स