मडुरा सोसायटीत भात खरेदीचा शुभारंभ
बांदा :
बांदा /राकेश परब: राज्य शासनाच्या खरीप पणन हंगाम २०२०-२१ आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत मडूरा सोसायटी येथे भात खरेदी शुभारंभ करण्यात आला. प्रगतशील शेतकरी नकुल परब यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोसायटी चेअरमन संतोष परब, संचालक यशवंत कुबल, स्वप्नाली परब, माजी उपसरपंच उदय चिंदरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, पोलीस पाटील नितीन नाईक, गटसचिव सुभाष राऊळ, वरिष्ठ लिपीक प्रकाश जाधव, सेल्समन सोमनाथ परब, लिपीक सौ. परब आदी उपस्थित होते. खरीप पणन हंगाम आधारभूत धान्य खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनाने भात खरेदीसाठी प्रति क्विंटल १९४० रुपये दर निश्चित केला आहे. ज्या शेतकर्यांनी आँनलाईन भात नोंदणी केली आहे अशा शेतकर्यांनी भात नोंदणी केलेला सातबारा घेऊन भात विक्रीसाठी आणावे असे आवाहन यावेळी सोसायटी मार्फत करण्यात आले. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन संतोष परब यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)