ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांची लोक अदालत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांची लोक अदालत.

प्रकाशन: 09 Dec 2021 04:37 PM
वाचन संख्या 19

ओरोस / प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्हालटकर यांनी केले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे,धनादेश अनादर, बँककेची कर्ज वसुली, मोटार अपघात नुकसान भरपाई, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भूसंपादन, विद्युत, पाणीदेयक व घरपट्टी, दिवाणी (भाडे,वहिवाटीचे हक्क, मनाई हुकुमाचे दावे इत्यादी ) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी ज्या पक्षकरांची संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्याकरिता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा आणि राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन श्री. म्हालटकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स