ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सुकळवाड ब्राम्हणदेव २०२१ वार्षिक जत्रोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

सुकळवाड ब्राम्हणदेव २०२१ वार्षिक जत्रोत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

प्रकाशन: 08 Dec 2021 07:04 PM
वाचन संख्या 39

ओरोस /प्रतिनिधी : ब्राम्हणदेव सुकळवाड च्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध गटातील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील खुल्या गटातील स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१००१ रुपये, एक ग्रामपंचायत स्पर्धेसाठी ८००१ रुपये, सुकळवाड करंडक स्पर्धेसाठी ५००१ तर १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०१ रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळ सुकळवाड च्या वतीने १२ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कै.पंच दिलीप सावंत चषक एक ग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ८००१, द्वितीय ६००१ व चषक ठेवण्यात आले आहे. १६ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या सुकळवाड करंडक (गाव मर्यादित) क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००१, द्वितीय ३००१ व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या १४ वर्षाखालील मुलांच्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १५०१ रूपये, द्वितीय १००१ ठेवण्यात आले आहे. तर १९ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत खुल्या गटातील श्री ब्राम्हणदेव चषक क्रिकेट स्पर्धा होणार असून या साठी प्रथम पारितोषिक २१००१ व द्वितीय ११००१ रूपये ठेवण्यात आले असून सर्व गटातील स्पर्धांमधील उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी जिल्ह्यातील क्रिकेट संघानी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी. तसेच २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री ब्राम्हणदेव सुकळवाडच्या वार्षिक जत्रोत्सवचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ब्राम्हणदेव क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स