नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात चिंदर येथील श्री. शंकर घागरे यांचा सन्मान
कंदील ह्या मालवणी कवितेचा पाचशे अग्रक्रमी कवितेमध्ये समावेश
आचरा/विवेक परब : – कुसुमाग्रज नगरी नाशिक येथे संपन्न झालेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उत्कुष्ट रचना सादर केल्या बद्दल चिंदर येथील (सध्या मुंबई-स्थित) “शंकर तुकाराम घागरे” यांच्या “कंदील” ह्या मालवणी बोलीभाषेतील कवितेला 2500 कवितांमधून निवडक 500 कवितांमध्ये स्थान मिळाले व त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .ह्या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातूनच न्हवे तर मध्यप्रदेश कर्नाटक दिल्ली अशा देशातील विविध भागांतून आलेल्या मराठी साहित्यिकांनी त्यांच्या बोलीभाषेतील सादर केलेल्या साहित्य व त्यामध्ये मिळवलेल्या घागरे यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
साहित्य संमेलनाला उदघाटक लेखक विश्वास पाटील, मराठी राजभाषा मंत्री सुभाष देसाई, गीतकार जावेद अख्तर, स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान लेखक श्री. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली होती. संमेलनाला राजकीय, : : सामाजिक, कला साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी तसेच सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. समारोपाच्या वेळी प्रमुख पाहुणे मा. खा. शरद पवार, जेष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर , मा.ना. बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
ग्रंथ दिंडी, परिसंवाद, कविकट्टा, गझलमंच ,ग्रंथप्रदर्शन, पुस्तकप्रदर्शन, कलाप्रदर्शन अश्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमाग्रज नगरी,भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव ,नाशिक येथे दि. ३ ते ५ डिसेंबर सलग तिन दिवस हे संमेलन पार पडले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)