मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात...
मुंबई प्रतिनिधी: आज 8 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
• नागपूर येथील राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी वारंगा (ता.जि.नागपूर) येथे विद्यार्थी वसतिगृह आणि इतर निवासी इमारती बांधकामासाठी निधी (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)• कोविड 19 पार्श्वभूमीवर स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी इरादा पत्राचा कालावधी वाढवणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
• महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ निर्माण करण्याचा निर्णय. (कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग)
• महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 मधील कलम- 2 (g) (iv) आणि सदर नि अधिनियमाच्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 (da) मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग)•बाजार समित्या मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग).
• शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थांमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये इंटर्नशिप (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)