सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळाची गणित संबोध परीक्षा सुरळीत पार.
बांदा / राकेश परब : महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी गणित संबोध परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरळीत पार पडली . विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पना कितपत समजलल्या आहेत याची माहिती या संबोध परीक्षेच्या माध्यमातून होते. दरवर्षी ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी इयत्तेसाठी घेतली जाते. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा होऊ शकली नव्हती.म्हणून यावर्षी ५वी व ६वी तसेच ८वी व ९वी इयत्तांसाठी ही परीक्षा आयोजित केली होती. बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत या परीक्षेला पाचवी व सहावी इयत्तांमधून ५५विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सरोज नाईक ,उपशिक्षक रंगनाथ परब व श्री जे.डी .पाटील यांनी परीश्रम घेतले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)