पाडलोस ग्रामदैवत श्री देव रवळनाथ जत्रोत्सव
बांदा / राकेश परब: सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवार दि. ९ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व नियम भाविकांनी पाळून दर्शनाचा लाभ घेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. सामाजिक अंतर राखून तसेच नियमांचे पालन करून भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)