जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग.
ओरस /प्रतिनिधी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग याच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन २०२१ निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान सीमेवर रक्षण करत असतात. त्यामुळे आपण शांतपणे जीवन जगू शकतो. त्यांच्या दिनक्रमाचा अनुभव मी माझ्या प्रशिक्षणादरम्यान घेतला. त्याचा मला एक भारतीय म्हणून अभिमान आणि गर्व असल्याचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सांगितले . तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात जिल्हावासियांनी मदत करुन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड आदी उपस्थित होते..आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिक सदैव सीमेवर आपली सेवा बजावत असतात. ही सेवा बजावत असताना ते स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा करतनाहीत . एकाच युनिफॉर्ममध्ये ते कित्येक दिवस लढत असतात . अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये देशासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता कामा नये . अशा माजी सैनिक, वीर पिता, वीर माता, वीर पत्नी त्यांचे पाल्य या सर्वांसाठी या निधीचा वापर केला जातो. अशा निधीत जिल्हा वासियांनी आपले योगदान देऊन जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट केवळ पूर्ण न करता ते पार करावे, असे शहीद जवानांचे स्मरण व त्यांना अभिवादन करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले , देशाच्या रक्षणार्थ बलिदान करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना या निधीमधून सहाय्य केले जाते. अशा निधीत प्रत्येकाने योगदान देणं याच्यासारख मोठं कार्य नाही. पोलीस दलातर्फे या पूर्वीही 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून पुढेही निश्चितच ते केले जाईल . त्याचबरोबर दलातर्फे आवश्यक ती सर्व मदत केली जाईल . तसेच अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)