ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ

प्रकाशन: 09 Aug 2021 11:23 PM
वाचन संख्या 65

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा तसेच डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा, या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. फर्स्ट इयर डिप्लोमासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.१३ ऑगस्ट तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अंतिम मुदत दि. ११ ऑगस्ट पर्यन्त वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीमध्ये मध्ये E-Scrutiny व Physical E-Scrutiny असे दोन पर्याय आहेत. कोविड-१९ च्या प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजना मध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या साठी E-SCRUTINY या पर्यायचा निवड करणे अशी सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करण्यात येत आहे. Physical Scrutiny या पर्याय मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरून ,प्रिंट घेऊन सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्या ऐवजी जन्म प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह १.स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), २. संगणक (Computer) अभियांत्रिकी (प्रवेश क्षमता -६०) , ३ विद्युत (Electrical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ४. अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०), ५. यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी(प्रवेश क्षमता -६०) व ६. अन्न तंत्रज्ञान (Food Technology) (प्रवेश क्षमता -२०) या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी प्रवेश प्रक्रियेसाठी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सुविधा केंद्र(FC) व निश्चिती केंद्र (ARC) यांचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे.अधिक महितीसाठी www.gpmalvan.co.in या संकेतस्थळावर तसेच प्रा.डी.एन.गोलतकर-9764513133, डॉ. वाय.व्ही.महाडीक-9423682846, प्रा.संदेश जोशी- 9422641384 यांच्याशी संपर्क साधावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स