ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राष्ट्रीय महामार्ग ही जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचा राज्य सरकारचा दावा...!

राष्ट्रीय महामार्ग ही जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचा राज्य सरकारचा दावा...!

प्रकाशन: 30 Nov 2021 08:53 AM
वाचन संख्या 48

न्यायालयाने व्यक्त केले खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीबाबत समाधान ..!

मुंबई | ब्युरो न्यूज  : महाराष्ट्र राज्यातील मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जागा संपादित करणे, ती हस्तांतरित करणे आणि कामावर देखरेख ठेवणे ही कामेच केवळ राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.
चौपदरीकरणाच्या कामादरम्यान महामार्गावर पडलेले खड्डे न्यायालयाच्या आदेशानुसार बुजविण्यात आले आहेत व आता केवळ तीन किमीहून अधिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अद्याप शिल्लक असल्याचा दावाही सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात केला.
त्यावर न्यायालयाने खड्डे दुरुस्तीच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना महामार्गाच्या कोणत्या टप्प्यातील काम पूर्ण झाले, कोणत्या टप्प्यातील अद्याप शिल्लक आहे याचा तपशीलवार अहवाल ३ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचए) दिले. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डय़ांमुळे प्रवास करणे धोकादायक बनलेले आहे, असा आरोप करत न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी एडव्होकेट ओवेस पेचकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स