ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर ठरले राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न 2021..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर ठरले राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न 2021..!

प्रकाशन: 29 Nov 2021 12:20 AM
वाचन संख्या 99


ऐश्वर्य मांजरेकर यांच्या रूपाने मालवण तालुक्याला प्रथमच हा मान झाला प्राप्त…!

मालवण | ब्युरो न्यूज :  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद तर्फे कला, क्रीडा ,  सामाजिक , साहित्यिक आणि संशोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणांना व संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो .
‘पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ असा उदात्त हेतू ठेवून लोकसेवा अकादमी दरवर्षी अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करते .यंदा सन http://localhost/news/public/uploads/2021 यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराचे मानकरी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे सुपुत्र ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे .

ऐश्वर्य मांजरेकर यांच्या सामाजिक ,  शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई व गुणीजन गौरव महापरिषदेचे अध्यक्ष  अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. सदर पुरस्कार सोहळे मुंबई, पुणे , नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहेत . पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह , लक्षवेधी गौरवपत्र ,  विशेष महावस्त्र , खास मानपत्र ,  मानकरी बॅच व मानाचा फेटा असे  असून  समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ  विजयकुमार शहा  व नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2021 जाहीर केल्याबद्दल समाजातील विविध स्तरांसह समस्त सिंधुदुर्गवासीय व मालवणवासीयांतर्फे त्यांची विशेष प्रशंसा केली जात आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स