ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात खळबळ..! (विशेष वृत्त)

मालवणात खळबळ..! (विशेष वृत्त)

प्रकाशन: 26 Nov 2021 09:15 PM
वाचन संख्या 636

चार नॅशनलाईज्ड बॅन्क कर्मचार्यांविरोधात फौजदारी स्वरुपांत चौकशीचे आदेश..!

रुचिरा हाॅटेलचे मालक मंगेश विश्वनाथ जांवकर यांनी केली होती तक्रार…!

आरोपींवर 420,403,409,427 व कलम 120(ब) अन्वये गुन्हे झाले होते दाखल..!

मालवण | सुयोग पंडित : बॅन्क ऑफ इंडियाच्या या नॅशनलाईज्ड बॅन्केच्या ,मालवण शाखेतील तत्कालीन चार कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश प्रथमवर्ग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांच्याकडून देण्यात आले आहेत. सदर चार कर्मचाऱ्यांवर आर्थिक फसवणूक आणि व्यवहारीक हेराफेरीचे आरोप केले गेले असून फिर्यादी मंगेश जावकर यांना गेली पाच वर्षे या प्रकरणात आर्थिक, मानसिक मनःस्ताप होत असल्याचे आरोप श्री मंगेश जावकर यांनी त्यांचे वकिल गजानन नारायण देसाई यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहेत. प्रकरणाची न्यायालयाने दखल घेऊन त्याची पुढील विशेष मालवण पोलिस स्टेशनच्या अधिकार्यांमार्फत केली जाण्याचे आदेश मालवण प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत.
फिर्यादी मंगेश जावकर यांच्या तक्रारीनुसार प्राॅपर्टी नं 44331,गाळा क्र.8 ,मालवण नगरपरिषद मालमत्ता क्रमांक 1771(सी) 8,शाळिग्राम काॅम्प्लेक्स,सोमवारपेठ मालवण, जि.सिंधुदुर्ग या जागेच्या (गाळा) दिनांक 22 जून http://localhost/news/public/uploads/2016 रोजी बॅन्क ऑफ इंडिया मार्फत दिलेली लिलावाची नोटीस वाचून त्यानुसार 25 जून http://localhost/news/public/uploads/2016 रोजी झालेल्या लिलावात यशस्वी बोली लावली होती .सदर बोलीच्या रकमेची इ.एम.डी.रक्कम रुपये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार (1,98,000) हे त्यांनी दिनांक 21 जुलै http://localhost/news/public/uploads/2016 रोजी बॅन्क ऑफ इंडिया, शाखा, मालवण येथे भरणा केली होती. दिनांक 22 जून http://localhost/news/public/uploads/2016 रोजी उरलेली सर्व रक्कम म्हणजे रुपये चौदा लाख त्र्याण्णव हजार इतकी त्यांनी बॅन्क ऑफ इंडिया मालवण शाखा येथे पूर्ण भरणा केली व त्याच्या भरण्याच्या पावत्याही बॅन्केकडून देण्यात आल्या.
हे करताना ज्या बॅन्क ऑफ इंडियाच्या चार तत्कालीन मालवण बॅन्क शाखेच्या कर्मचार्यांनी ही सर्व प्रक्रिया पार पाडली त्यात आरोपी क्रमांक 1) श्री.ऋषिकेश गावडे , 2)श्री.संजय कन्हैयालाल दवे, 3)श्री.सुनिल कुमार,4) श्री. किशोरकुमार जाधव हे होते.
श्री.जावकर व त्यांच्या वकिलाच्या तक्रारीनुसार शाळिग्राम काॅम्प्लेक्समधील ती मूळ जागेसंबंधी मालमत्ता संकल्प डेव्हलपर्सची होती व त्यावर पुणे येथील डि.आर.टी.कोर्ट येथे खटला सुरु होता .तो खटला सुरु असण्याच्या कालावधीतच तत्कालीन बॅन्क ऑफ इंडियाने लिलाव करुन ती जागा विक्रीस काढल्याची कल्पना श्री .जावकर यांना दिली नाही आणि सोबतच त्याजागेचा भौतिक ताबा (फिजीकल पझेशन) देण्यासाठी बॅन्केशी वारंवार संपर्क, पत्रव्यवहार करुन, ती जागा दिनांक 21 फेब्रुवारी रोजी एक अनरजिस्टर्ड सेल सर्टिफिकेट करुन देण्यात आली.
जवळपास अडिच वर्षे बॅन्केने एकूण लिलाव रक्कम रुपये एकोणीस लाखाच्या वर घेऊनही जागेचा प्रत्यक्ष ताबा दिला नव्हता. या दरम्यान व्यवसायाचे झालेले नुकसान आणि मनःस्ताप व फसवणुकीबद्दल श्री.मंगेश जावकर यांनी तक्रार दाखल केली होती.
जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर केवळ व्यवसायाची नितांत गरज असल्याने श्री.जावकर यांनी तिथे व्यवसाय सुरु केला व रजिस्टर्ड सेल सर्टिफिकेटसाठीही बॅन्केचा पाठपुरावा केला तरिही बॅन्केने आजतागायत ते दिलेले नाही.
आता श्री जावकर यांनी केलेल्या आरोपानुसार त्या अडिच वर्षांच्या काळात बॅन्केच्या सगळ्या भरणा पावत्या व इतर कागदपत्रांवर बॅन्केचीच मोहोर असल्याने बॅन्केच्या त्या चारही तत्कालीन कर्मचारी व आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती . दरम्यान संकल्प डेव्हलपर्सवर त्याच जागेचा एक खटला चालू असून त्यांनी एका पतसंस्थेकडून काही लाखांचे कर्जही घेतले असून त्याला बॅन्क ऑफ इंडियाने एन.ओ.सी.कशी दिली असाही सवाल होता परंतु त्यासाठी डि.आर.टी.कोर्टात आरोपींनी खोटी प्रतिज्ञापत्रे दिली असल्याचेही फिर्यादी जावकर यांचा आरोप आहे.
यादरम्यान आर्थिक टंचाई, कोरोनाकाळ आदीमुळे श्री.जावकर यांना मनःस्ताप सहन करावा लागत होता व आजही लागतो आहे असे जावकर यांच्या वकिलामार्फत सांगण्यात आले.
बॅन्क ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीयकृत बॅन्केच्या कर्मचार्यांविरुद्ध तक्रार करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व पावत्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी तपासल्यानंतरच सदर प्रकरण फौजदारी चौकशीसाठी मालवण पोलिसस्टेशन अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी गेल्याचेही फिर्यादिंच्या वकिलांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकरण हे 420,403,409,427 व कलम 120(ब) अन्वये तपासणीसाठी व फौजदारी चौकशीसाठी पात्र ठरले आहे.
रुचिरा हाॅटेल मालवण येथील पत्रकारपरिषदेत या फौजदारी चौकशीच्या आदेशांची झेरॉक्स प्रत श्री.जावकर यांचे वकिल श्री गजानन देसाई यांनी सादर केली .
यावेळी रुचिरा हाॅटेलचे मालक व फिर्यादी श्री.मंगेश जावकर स्वतःदेखील उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स