ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोविड 19 लसीकरण संदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन....

कोविड 19 लसीकरण संदर्भात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन....

प्रकाशन: 26 Nov 2021 11:03 AM
वाचन संख्या 118

ओरोस | प्रतिनिधी : जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोविड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व नागरिक आणि गर्भवती महिला ज्यांनी कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत, अशांना धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून खुली करणेत येत आहेत. तसेच धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी कोविड -19 व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले दिनांक 12 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2021 रोजीचे, आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तशाच लागू राहतील.उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम http://localhost/news/public/uploads/2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरचा आदेश संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाच्या क्षेत्रासाठी लागू राहील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स