ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सच्चाई व इमानदारीच्या व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट : श्रीकांत सांबारी

सच्चाई व इमानदारीच्या व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट : श्रीकांत सांबारी

प्रकाशन: 26 Nov 2021 10:28 AM
वाचन संख्या 106

आचरा व्यापारी संघटनेची वार्षिक  सत्यनारायण पूजा आणि गुणगौरव कार्यक्रम उत्साहात..

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा व्यापारी पेठेची भरभराट येथील व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि सचोटीच्या व्यापारामुळे झाली आहे. याचा आदर्श युवा व्यापाऱ्यांनी घेऊन या बाजार पेठेची भरभराट करण्याचे आवाहन वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन आणि जेष्ठ व्यापारी श्रीकांत सांबारी यांनी केले.
आदर्श आचरा व्यापारी संघटनेचा  स्नेहसमारंभ आणि वार्षिक सत्यनारायण महापूजा आयोजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर,उपसरपंच  पांडुरंग वायंगणकर, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष मंदार सांबारी, माणिक राणे, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, हेमंत गोवेकर,निलेश सरजोशी, जेष्ठ व्यापारी विनायक परब,अनिल करंजे,राजन पांगे,श्रीमती लाड यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ व्यापारी विनायक परब,अनिल करंजे, शिवराम शेटये,रघुवीर ढेकणे, अरविंद घाडी,लालजी पटेल या जेष्ठ व्यापाऱ्यांचा तसेच वकीली परीक्षा पास झालेली अँडव्होकेट सायली : आचरेकर, पदवी परीक्षा उत्तिर्ण  मिनल कोदे यांसह दहावी बारावी पास व्यापारी पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना विनायक परब,अनिल करंजे यांनी व्यापारी संघटनेच्या कार्याचा गौरव : केला. रात्री संपन्न झालेल्या बुवा समिर कदम,अरुण घाडी,पुजारे यांच्या तिरंगी भजनाच्या जंगी सामन्याने उपस्थितांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आचरा व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परीश्रम घेतले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स