ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावाना ३१ डिसेंबरपूर्वी मिळणार मंजुरी..!

वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रस्तावाना ३१ डिसेंबरपूर्वी मिळणार मंजुरी..!

प्रकाशन: 25 Nov 2021 05:03 PM
वाचन संख्या 40

प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याशी सकारात्मक चर्चा

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व गटनेते रणजित देसाई यांच्या पुढाकाराने जि. प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा झाली.यावेळी उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर,वित्त व लेखाधिकारी वल्लरी गावडे, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख उपस्थित होते.गेले अनेक दिवस शिक्षकांचे पगार सातत्याने विलंबाने होत आहेत ही बाबसंघटनेच्यावतीने जि.प.अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिली व कार्यपद्धतीबद्दल संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली त्यावर अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी शिक्षकांचे पगार शासनाकडून अनुदान प्राप्त होताच पाच ते सहा दिवसात करण्याचे निर्देश वित्त व लेखा अधिकारी यांना दिले आहेत.त्यावेळी वित्त व लेखा अधिकारी यांनी यापुढे शिक्षकांचे पगार अनुदान प्राप्त होताच पाच ते सहा दिवसात करण्याचे मान्य केले.वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव गेले दहा महिने प्रशासना कडून अद्यापही मंजूर करण्यात आलेले नाहीत ही बाब जि. प.अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावातील त्रुटी दूर करुन ३१ डिसेंबर २०२१पर्यंत सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले व यापुढे तालुका कार्यालयांकडून कोणत्याही प्रकारच्या त्रुटी न राहता परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात येतील असे ही आश्वासन दिले आहे.२००५ पूर्वीच्या ज्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे अशा शिक्षकांचे कपात करण्यात आलेले डी सी पी एस हप्ते व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे एक ते पाच हप्ते भविष्य निर्वाह खाती जमा करणे बाबत सर्व माहिती घेऊन संबंधित शिक्षकांच्या भविष्य निर्वाह खाती सदर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन वित्त व लेखा अधिकारी यांनी दिली आंतर जिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे व आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक पाच मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होणे. याबाबत डिसेंबर मध्ये संघटने सोबत स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन जि.प.अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले.यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे ,राज्य संघटक किसन दुखंडे,सरचिटणीस अरुण पवार, मुख्य सल्लागार महेश नाईक उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र देसाई, कार्यालयीन सचिव दिनकर शिरवलकर,आंतरजिल्हा बदली प्रतिनिधी सचिन डोळस उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स