मसुरे गांवात १८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील मसुरे गांवचे ग्रामदैवत देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त विधिवत पूजन, सायंकाळी दीपोत्सव, व रात्री तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक तर दुसऱ्या दिवशी पहाटे गाडगे फोडून उत्सवाची सांगता होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगांवकर व संग्राम प्रभुगांवकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)