मुंबईस्थित पळसंब ग्रामस्थांनी गांवच्या अत्यावश्यक प्रश्नांकडे वेधले राज्यमंत्र्यांचे लक्ष...!
चिंदर | विवेक परब : मुंबईस्थित मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मंगळवारी राज्य मंत्रालयात भेट घेत पळसंब मध्ये नविन आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी निवेदन दिले. यावेळी श्री. गिरिधर पुजारे, राजेश भंकाळ, परशुराम परब, प्रदिप परब, देविदास पुजारे, हरिष सावंत इत्यादी उपस्थित होते. गावच्या प्रलंबित आणि अत्यावश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी मुंबईकर ग्रामस्थांनी केलेल्या कार्याबद्दल पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सर्व ग्रामस्थांचे विशेष आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)