पालकमंत्री उदय सामंत यांनी केले कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मुदतठेव प्रमाणपत्रांचे वितरण...!
ओरोस | प्रतिनिधी : कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 14 बालकांना 5 लक्ष मुदत ठेव प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा उपस्थित होते. जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी सुरुवातीला याबाबत माहिती दिली. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. पी.डी. देसाई, स्नेहलता चोरगे, प्रतिभा नाटेकर, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त एस.जी. पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे नितीन काळे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)