ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विलवडे येथील पुरग्रस्तांना शासनाकडून अद्याप पर्यंत नुकसान भरपाई नाही..

विलवडे येथील पुरग्रस्तांना शासनाकडून अद्याप पर्यंत नुकसान भरपाई नाही..

प्रकाशन: 14 Nov 2021 10:48 AM
वाचन संख्या 43

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले पूरग्रस्तांनी निवेदन

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावात जुलै महिन्यात आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकरी तसेच ग्रामस्थांना अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही. नुकसान ग्रस्त लोकांच्या खात्यात निधी जमा व्हावा. तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी विलवडे ग्रामस्थानी केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आले. नुकसानग्रस्ताना २० नोव्हेंबर पुर्वी नुकसान भरपाई न मिळाल्यास तहसिलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा ग्रामस्थानी यावेळी दिला. आँगस्ट २०१९ आणि जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात विलवडे गावातील लोकांचे शेती,बागायतीचे लाखो रुपायांचे नुकसान झाले. झालेले नुकसान पाहता शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई पुरेशी नाही.मात्र प्रशासकिय कार्यालयातील कर्मचा-यांच्या मनमानी तसेच सदोष कामामुळे शासनाची तुटपुंजी मदत सुद्दा पुरग्रस्तांना मिळवण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची नाराजी मळावाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक दळवी यांनी व्यक्त केली. यावेळी सोमवारी याबाबत संबंधितांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच आश्वासन म्हात्रे यांनी दिलं.यापुर्वी विलवडेत आलेली मदत देताना गावातील लोकांना वारंवार डावलण्यात आल्याचे आरोप ग्रामस्थांनी केला. शासनाने निर्धारीत केलेली रक्कम काही मोजक्याच ग्रामस्थांना मिळाली असून उर्वरित वंचित नुकसानग्रस्ताना २० नोव्हेंबर पुर्वी न मिळाल्यास तहसिलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा कडक इशारा ग्रामस्थानी दिला. यावेळी सखाराम सावंत,अरुण दळवी,सखाराम दळवी तसेच मळावाडी,फाैजदारवाडी, पिसुळे(वरचीवाडी)येथील पुरग्रस्त बहुसंख्येत उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स