ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रा. दंडवते आदर्श निस्पृह व्यक्तित्व! ; श्रीकृष्ण हरचांदे

प्रा. दंडवते आदर्श निस्पृह व्यक्तित्व! ; श्रीकृष्ण हरचांदे

प्रकाशन: 13 Nov 2021 03:53 PM
वाचन संख्या 59

कट्टा येथे प्रा. मधु दंडवते स्मृतिदिन संपन्न

सेवानिधी व बक्षीस वितरण समारंभ.

मसुरे | सौ .प्राजक्ता पेडणेकर : कोकणचे भाग्यविधाते, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचा सोळावा स्मृतिदिन बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे माता यशोदा आरोग्य अंक संपादक श्रीकृष्ण हरचांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
श्रीकृष्ण हरचांदे यांनी १९७७ च्या ऐतिहासिक निवडणूकीतील जयप्रकाश नारायण यांचे सोबतची आठवण यावेळी सांगितली. प्रा. दंडवते यांच्यासारखे निस्पृह व्यक्तित्व सर्वानाच आदर्शवत आहे त्यांच्या विचाराने चालणाऱ्या सेवांगणास सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले.
सेवांगणच्या कट्टा शाखेचे अध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या विविध आठवणींना उजाला दिला. बॅ नाथ पै यांच्या निधनानंतर प्रा मधु दंडवते यांची उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत चा घटनाक्रम. विषद केला.
सेवांगणच्या कार्यकारिणीचे सदस्य नितीन वाळके यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या सोबत घालवलेल्या अनेक सुवर्णक्षणांची आठवण जागृत केली. उच्च पदावर काम करुनही सामान्य कार्यकर्त्यांसोबत सामान्य जनतेसोबत मित्रत्वाच्या नात्याने वागणारे मधु दंडवते आमच्यासाठी सर्वस्व आहेत याचा उल्लेख केला
दीपक भोगटे यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाची माहिती दिली. व सेवांगणचे कार्य हे प्रा. मधु दंडवते यांच्या विचाराप्रमाणेच चालू आहे व सुरु राहील याची ग्वाही दिली.
यावेळी आकाश कंदील व भेट कार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीकृष्ण हरचांदे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दिवाळीनिमित्त आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिवणविभागाच्या महिलांसाठी घेतलेल्या ९ विविध स्पर्धांचे सुध्दा बक्षीस वितरण भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आले.
यावेळी होतकरु विद्यार्थ्यासाठी असलेला मधु दंडवते सेवानिधी १० विद्यार्थ्याना वितरीत करण्यात आला.
यावेळी श्रीकृष्ण हरचांदे, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, नितीन वाळके, शाम पावसकर, सुजाता पावसकर, अनिल चव्हाण, श्री कुडतरकर, रवींद्र नाईक, विद्यार्थी, पालक ग्रामस्त आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स