चिंदर अपराज-कोंडवाडी येथील श्री देव वाडोत्री ब्राह्मण देव मंदिरात १५ नोव्हें. पासून हरिनाम सप्ताह
चिंदर | विवेक परब : चिंदर अपराज-कोंडवाडी येथील श्री देव वाडोत्री ब्राम्हणदेव मंदिरात सोमवार १५ नोव्हेंबर पासून सातप्रहराच्या हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. सकाळी श्रींची विधीवत पूजाअर्चा, धार्मिक विधी व नंंतर हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. मंगळवारी १६ रोजी पहाटे काकड आरती व नंतर सप्ताह समाप्ती व महाप्रसाद, १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत होम, टिपर, डाळप व सत्यनारायण महापूजा असे कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे मंडळातर्फे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)