चिंदर येथील जागृत श्री.आकारी ब्राह्मण देव मंदिरात १५ नोव्हे. रोजी अखंड हरिनाम सप्ताह
चिंदर | विवेक परब : चिंदर गावठणवाडी येथील शिवकालीन तलावाच्याकाठी वसलेल्या जागृत देवस्थान श्री आकारी ब्राम्हण देव मंदिरात सोमवार दि.१५ नोव्हे. रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी विधीवत पूजा होऊन हरिनाम सप्ताहाला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजल्यापासून दशक्रोशीतील नामवंत भजने, मेळ तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत हरिनामाचा आनंद लुटतील व सप्ताहाची सांगता होईल. अखंड हरिनाम सप्ताहास सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेण्याचे आवाहन चिंदर गावठणवाडी उन्नती मंडळाने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)