ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हावासियांच्या लाखमोलाच्या अप्रुपाचे झाले बारा हजार.....!

जिल्हावासियांच्या लाखमोलाच्या अप्रुपाचे झाले बारा हजार.....!

प्रकाशन: 10 Nov 2021 12:45 PM
वाचन संख्या 153

चिंदर  | विवेक परब : सामान्यांना परवडणार्या उडाण योजनेनंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश केल्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास अडिच हजार रुपयांत करता येणार हे सुखद अप्रूप सिंधुदुर्गवासीयांना होते. विमानतळ सुरू झाल्यामुळे अडिच हजार रुपयांत कोकणात विमानाने जाण्याचे व कोकणातून मुंबईकडेही विमानाने झेपावयाचे स्वप्न सत्यात उतरले असतानाच असतानाचं विमान तिकीटाचा दर वाढल्याने आता विमान प्रवास महागला आहे. महिन्याभरातच मुंबई ते सिंधुदुर्ग विमानतळ तिकिटाचे दर 12 हजार रुपये झाला आहे.
सिंधुदुर्गातून मुंबई आणि मुंबईतून आपल्या गावी सिंधुदुर्गात येण्यासाठी चाकरमानी तसेच स्थानिक प्रवाशांना अडिच हजार रुपये तिकीट दर हा काही अंशी परवडणारा होता. मात्र दिवाळी सण संपताच सिंधुदुर्ग मुंबई विमान प्रवास भाड्याने मोठे उड्डाण केले असून अडीच हजार रुपयाला मिळणारी विमान तिकीट आता 12 हजार रुपयाला मिळत आहेत. तब्बल चौपट वाढलेल्या विमान तिकीट दरामुळे सिंधुदुर्ग मुंबई प्रवास चिपीपेक्षा गोव्यातून मुंबईपर्यंत विमानाने केलेलाच उत्तम आहे किंवा रेल्वे व आरामगाड्यांनाच पसंती दिली जाईल अशी भावना सामान्य सिंधुदुर्ग वासियांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स