ताज्या बातम्या
सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग. मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन. आंबोली घाटातली वाहतूक एका तासात पूर्ववत झाल्याची राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची माहिती. दिवाळीत प्रकाशाचे चैतन्य अनुभवत 'जल मोल' जाणायचे व जपायचे प्रशासनाचे आवाहन. 'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!
'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!'

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)

'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!'


स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात इच्छुकांसाठी 'जर्मन भाषा फाऊंडेशन कोर्स' साठी नोंदणीचे आवाहन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑ. सोसायटी व स. का. पाटील कला वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिना कालावधीचा 'जर्मन भाषा फाउंडेशन कोर्स' ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाणार आहे. या कोर्स मध्ये सहभागी होण्यासाठी १ डिसेंबर पर्यंत आपली नाव नोंदणी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे.


या प्रशिक्षणासाठी जर्मन भाषेचे पूर्वज्ञान आवश्यक नसेल. या कोर्ससाठी किमान वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष अशी आहे. दहावी, बारावी, पदवी व पदवीत्तर विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख १ डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते,(8381022529), प्रा. डॉ. उज्वला सामंत (9421261439), लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत (8767586269), प्रा. डॉ. देविदास हारगिले (9421189907) यांच्याशी इच्छुकांना संपर्क साधता येऊ शकतो. १ डिसेंबर २०२६ पर्यंत महाविद्यालयात नाव नोंदणी करायचे आवाहन प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले आहे.


'लास्ट उन्स डॉयच लर्नेन,' म्हणजेच, 'चला, जर्मन भाषा शिकुया' अशा ह्या आवाहनाबद्दल मालवणात, इच्छुकांना भाषेच्या अभिलाषेचा एक नवीन अध्याय अभ्यासता येऊ शकेल आणिॅ व्यावसायिक दृष्टिकोनातून जर्मन भाषा 'शिकून ठेवणे' असाही एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स