मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न.
मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील कातकरी वस्तीमध्ये, देवगड भाजपच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न झाला. सध्या या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
देवगड मंडल भाजपाच्या वतीने खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार अजित गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या निमित्ताने मुणगे येथील कातकरी वस्तीवर जाऊन तिथल्या बंधू भगिनींसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी पाड्यावर दिव्यांची रोषणाई करून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जि. प. सदस्य सुनील पारकर, तालुका उपाध्यक्ष गोविंद सावंत, भाजपा सरचिटणीस महेश जंगले, शिवदास रासम, बाप्पा निकम, सुनिल निकम उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..!
'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती...!मत्स्योद्...
आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा.
सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणुस गमावल्याची भावना : आमदार निलेश राणे
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या