ताज्या बातम्या
सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग. मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन. आंबोली घाटातली वाहतूक एका तासात पूर्ववत झाल्याची राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची माहिती. दिवाळीत प्रकाशाचे चैतन्य अनुभवत 'जल मोल' जाणायचे व जपायचे प्रशासनाचे आवाहन. 'डाऊट फूड' वर प्रशासनाची करडी नजर...!
समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी.

 

संबंधित गट, संस्था व नागरिकांच्या सहभागाचे विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आवाहन. 


जनसुनावणीच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट, सहजीवन (लिव्ह - इन) नातेसंबंध, भरण - पोषण, पालकत्व, वारसाहक्क व उत्तराधिकारी हक्काच्या विषयांबाबत नागरिकांची मते जाणून घेतली जाणार.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात दि. २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

 

समान नागरी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय जनसुनावणीसाठी भेट देणार आहे. या जनसुनावणीच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट, सहजीवन (लिव्ह-इन) नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क व उत्तराधिकारी हक्क या विषयांबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येणार आहेत.

 

कोकण महसूल विभागातील जनसुनावणीचे आयोजन दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे. ह्या सुनावनीचे नियोजन जिल्हा निहाय करण्यात आले आहे. यात दि. २१ नोव्हेंबर रोजी मुंबई शहर सकाळी ११ ते दुपारी १२, मुंबई उपनगर दुपारी १२.३० ते १.३०, पालघर दुपारी ३ ते ४ आणि सिंधुदुर्ग दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत जनसुनावणी होईल. तसेच दि. २२ नोव्हेंबर रोजी ठाणे सकाळी ११ ते दुपारी १२, रायगड दुपारी १२.३० ते १.३० आणि रत्नागिरी दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल.

 

या जनसुनावणीसाठी नागरिकांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे. या समितीचे सदस्य हे सुनावणी कामी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही समिती पुढे प्रत्यक्ष होईल. तसेच संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांची सुनावणी ही व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार आहे. 

 

तसेच ज्या नागरिकांना केवळ ऑनलाइन पद्धतीने आपली मते सादर करावयाचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असे ही विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगिलते.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.

मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निध...

09 Nov 2026 395
भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण...

09 Nov 2026 228

लोकप्रिय टॅग्स