ताज्या बातम्या
वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल. खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी. मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा. एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश.
वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन.

वसू बारस उत्सवाबाबत श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन.

Article image

सिंधुदुर्ग : भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गोमातेचे पूजन आणि गोसंवर्धनाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसुबारस उत्सव व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, यासाठी श्री गोपाळकृष्ण गोपालक संस्थेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. हे निवेदन, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांना सादर करण्यात आले.


महाराष्ट्र शासनाने गोमातेला 'राज्यमाता - गोमाता' असा दर्जा दिला असून, गोमातेचे महत्त्व केवळ धार्मिक किंवा भावनिक दृष्टिकोनासोबतच तिचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनातील योगदान देखिल समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचा ह्या निवेदनाचा आशय आहे.


वसुबारस हा केवळ धार्मिक सण म्हणून मर्यादित न राहता तो 'गोसंवर्धनाचा संकल्प दिन' म्हणून साजरा व्हावा अशी संस्थेची भूमिका आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, नगरपालिका, गोशाळा, गोपालक संघटना आणि सामाजिक संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.


विशेषतः शाळा व महाविद्यालयांमध्ये वसुबारस आणि गोसंवर्धन विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम, निबंध, वक्तृत्व, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यार्थ्यांना स्थानिक गोशाळांना भेट देण्याची संधी द्यावी, गोपालनाचे महत्त्व समजावून सांगावे तसेच देशी गोवंशाचे संवर्धन आणि गोपालकांच्या कार्याचा गौरव करावा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या वेळी चंद्रशेखर पुनाळेकर, भालचंद्र उर्फ राऊत, गोविंद फणसेकर, रुपाली देसाई, स्नेहल पेडणेकर, दिव्या तळेकर, भार्गवी परब, संदेश बांधकर आणि अनिल वारंग उपस्थित होते.


गोमातेचे रक्षण, गोवंशाचे संवर्धन आणि भारतीय संस्कृतीचे जतन, हाच वसुबारस उत्सवाचा खरा संकल्प या भावनेतून जिल्ह्यात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी आणि भावी पिढीमध्ये प्राणी मात्रांविषयी प्रेम, दया व करुणेचे संस्कार रुजावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही संस्थेच्या वतीने भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी माध्यमांना स्पष्ट केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स