सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल.
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर २०२६ (सोमवार) रोजी जाहीर करण्यात आली आहे.
शासनाच्या राजशिष्टाचार विभाग व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक १४ मार्च १९८३ रोजीच्या अधिसूचनेन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सन्माननीय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा बदल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीतील अ. क्र. ३ मध्ये हा बदल करण्यात आला आहे.
हा बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा.
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड.
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची म...
यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..!
यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या म...
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या