ताज्या बातम्या
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी. 'शितल'ची गस्ती आणि 'सुलतान'ची जप्ती..! उजळती दृष्टी आणि स्वप्नवत सृष्टी..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर रोजीच्या स्थानिक सुट्टीच्या तारखेत बदल. खासदार नारायण राणे यांच्याकडून हुंबरट येथे वनराई बंधाऱ्याची पाहणी. मालवण ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्वर यांचा बलिप्रतिपदे दिवशी ऐतिहासिक पालखी सोहळा. एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी.

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोळंब येथील पेयजलाचा प्रश्न मार्गी.

Article image

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या पुढाकारातून कूपनलिका उभारणी ; ग्रामस्थांची कृतज्ञता. 


मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कोळंब गावातील टेंबवाडी येथे जलस्रोतांमधील खाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेली पेयजलाची समस्या मार्गी लागली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून टेंबवाडी येथे बोअरवेलची उभारणी करून दिली आहे ज्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 


पेयजलाचा प्रश्न विचारात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला. शिवसेनेच्या माध्यमातून येथे बोअरवेलची उभारणी करण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर, स्वप्निल परब, शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके, चैतन्य लोके, सिद्धी लोके, सुशांत भोजने, राजू हडकर, प्रसाद डीचोलकर, रेहान भोजने, आदित्य आचरेकर, गणेश पेडणेकर, अजय लोके, प्रदीप भोजने, भटा फाटक, मंगेश लोके, महेश फाटक, सचिन नरे, नामदेव नरे, पुरुषोत्तम भोजने, सुधीर पेडणेकर, बाबू धुरी, रवींद्र जेठे, सुशांत लाड, प्रथमेश लाड, विजय भोजने, भास्कर कवटकर, राणी आचरेकर, सरिता हडकर, नंदा हडकर, मंदा हडकर, दीपा फाटक, सुमन भोजने, संगीता भोजने, निकिता भोजने, उर्मिला भोजने, शिवम भोजने, शिवम फणसेकर, तन्मय नरे, मिताली फाटक, सीमा फाटक, उत्तम हडकर, रेखा पेडणेकर, सुचिता पेडणेकर, भाई ढोलम यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


कोळंब टेंबवाडीतील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिण्यायोग्य गोडे पाणी मिळाले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांची दखल घेऊन बोअरवेलची उभारणी करून दिल्याबद्दल शिवसेना युवा कार्यकर्ते शरद लोके यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स