ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा शहरातील शेतकऱ्यांना १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कृषी अवजारे.

बांदा शहरातील शेतकऱ्यांना १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कृषी अवजारे.

प्रकाशन: 07 Nov 2021 06:04 PM
वाचन संख्या 43

बांदा | राकेश परब : बांदा शहरातील शेतकऱ्यांना १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान तत्वावर आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय बांदा ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सरपंच अक्रम खान यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सरपंच खान म्हणाले की, बांदा ग्रामपंचायतीने आतापर्यंत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत. शहरातील शेतकऱ्यांना, तरुणांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एकरकमी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातुन निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा. यासोबत बँक पासबुक, आधारकार्ड, सातबारा, आठ अ व रेशनकार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
शहरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच खान यांनी यावेळी केले. यावेळी उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, रिया आलमेडा, किशोरी बांदेकर, ग्रामविस्तार अधिकारी प्रसाद ठाकूर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स