ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांसोबत साजरी झाली माणुसकीची दिवाळी....!

स्मशानभूमितील कर्मचाऱ्यांसोबत साजरी झाली माणुसकीची दिवाळी....!

प्रकाशन: 07 Nov 2021 05:49 PM
वाचन संख्या 92

मसुरे | सौ प्राजक्ता पेडणेकर : मुंबई- भांडुप पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करणा-या कर्मचारी बांधवांचे दिवाळीच्या निमित्ताने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. शिवसेना प्रणित निष्ठावंत प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष संतोष वासुदेव नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम झाला.
कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय सुरू असलेली भांडुप पश्चिम येथील एल बी एस मार्गावरील हिंदू स्मशानभूमी ही एकमेव आहे. गेल्या दोन वर्षांच्या करोना महामारी काळात ‘अंत्यसंस्कार’ ही जागतिक बिकट समस्या बनली असतानाही ज्यांनी हे काम सुरळीत केले त्यांना खऱ्या अर्थाने करोना योद्ध्ये म्हंटल पाहिजे. याचीच जाण ठेवून भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 113 मधील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जननायकाची भूमिका घेणारे हे निष्ठावंत प्रतिष्ठान होय. निष्ठावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष
श्री.संतोष नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व माणुसकीची दिवाळी या नात्याने भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले गेले.
स्मशानभूमी चालवणाऱ्या भांडुप गुजराती सेवा ट्रस्ट चे देखील प्रतिष्ठानने आभार मानले आहेत.
गेल्या 35 वर्षांपासून येथील स्मशानभूमीत हे कर्मचारी अहोरात्र सेवा बजावत आहेत. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या काळात येथील स्मशानभूमीत 900 हून अधिक करोना बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तर अन्य दोन शव वाहिनीवर सुमारे 3 हजारहून जास्त मरण पावलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत नातेवाईकांशी विनम्र वर्तन करताना या कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान हे सीमेवर तैनात सैनिकी योद्धया इतकेच मानावे लागेल. पार्थिवाची अवहेलना होऊ नये, वेळेत अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी महामारीच्या काळात दिवस-रात्र एक केल्याच्या आठवणी आहेत.
या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता येण्याबरोबरच त्यांना मानसिक, कौटुंबिक आधार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संतोष नार्वेकर यांनी केले. यावेळी सरचिटणीस संजय तावडे, उद्योजक,दिपकजी म्हसकर, ट्रस्टचे व्यवस्था प्रमुख किशोरभाई देढिया,उपाध्यक्ष उदय महाडिक,दिलीप घाग,नरेश पाटील,राकेश निषाद,राजेंद्र लिपारे,संदीप मरतल,कमलाक्ष कोटीयन,गणेश वाडेकर व प्रतिष्ठानचे सदस्य,कर्मचारी आणि इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स