ताज्या बातम्या
तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग ( चिपी) - नवी मुंबई दरम्यानच्या दैनंदिन विमानसेवेमुळे पर्यटन आणि रोजगाराची नवी दालने खुली : पालकमंत्री नितेश राणे समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागाची २१ व २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जनसुनावणी. 'लास्ट उन्स डॉयच लर्नेन...!' मुणगेतील कातकरी वस्तीमध्ये देवगड मंडल भाजपाच्या वतीने 'पाडावरची दिवाळी २०२६' कार्यक्रम संपन्न. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांचा सहभाग. मालवणात आमदार निलेश राणे यांच्या प्राप्त निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार निलेश राणे यांचे अभिवादन. आंबोली घाटातली वाहतूक एका तासात पूर्ववत झाल्याची राष्ट्रीय महामार्ग सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती वृषाली पाटील यांची माहिती. दिवाळीत प्रकाशाचे चैतन्य अनुभवत 'जल मोल' जाणायचे व जपायचे प्रशासनाचे आवाहन.
तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)
Single image - Above Title (Nov 11, 2026)

तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Below Title (Nov 8, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)
Single image - Sidebar (Nov 13, 2026)

तळकटमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Article image

श्री अष्टविनायक मित्रमंडळ तळकट, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग, तळकट ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व ग्रामस्थ यांचे संयुक्त आयोजन. 


दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या तळकट येथे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. श्री अष्टविनायक मित्रमंडळ तळकट, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग, तळकट ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांच्या वतीने हे सहावे रक्तदान शिबिर होते अशी माहिती मिळत आहे. या शिबिरात ३५ जणांनी सहभाग नोंदवला आणि २६ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले ज्यात एका महिलेचा समाज प्रेरक सहभाग होता. 


या वेळी नियमित रक्तदान करणारे गोविंद देसाई (१५ वेळा रक्तदान) आणि गोविंद गवस (९ वेळा रक्तदान) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष भूषण सावंत, डॉ. राणे, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. कुनालवार, रेडकर, बागेवाडी, रविना, श्री. कांबळे, गोविंद गवस, रमेश शिंदे, उपसरपंच रमाकांत गवस, माजी शिक्षक दुर्गाराम गवस, शिवप्रसाद नाटेकर, संदीप वेटे, तात्या बांदेकर, प्रज्योत देसाई, दत्तप्रसाद सावंत, ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, अमोल मळीक, माजी सरपंच एम. डी. धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागात प्रगत सुविधांनी युक्त रुग्णवाहिका उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे आणि दोडामार्ग तालुक्यात अशा रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून, आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांची गैरसोय होते असे त्यांनी स्पष्ट केले.


सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, रक्त हे मर्यादित कालावधीसाठीच साठवता येते. रक्ताचा साठवण कालावधी साधारणतः ३५ ते ४२ दिवसांचा असल्याने नियमित रक्तदान होणे आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाची ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता गावागावांत पोहोचली पाहिजे, असे श्री. पिळणकर यांनी आग्रहपर आवाहन केले.


यावेळी सरपंच सुरेंद्र सावंत - भोसले यांनी युवकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याची गरज व्यक्त केली. रक्तदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून, युवकांनी या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.


भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी तळकट गावातील रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले. तळकट गावातून ५१ रक्तदाते तयार होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा नियमित रक्तदानाची सवय समाजात रुजणे आवश्यक आहे. याबाबत गावपातळीवर विचारविनिमय करून जनजागृती केली जाईल. सरपंच सुरेंद्र सावंत - भोसले हे आपल्या कामातून गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. आगामी काळात तळकट येथे भाजपाच्या वतीनेही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजी सरपंच एम. डी. धुरी यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स