दिविजा आश्रमात आजीआजोबांसोबत दिवाळी प्रभात..!
ब्युरो न्यूज | विवेक परब : असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आमच्या स्वरांगण संगीत विद्यालयातर्फे ‘दिवाळी प्रभात’ हा संगीतमय कार्यक्रम करण्याची संधी मिळाली! शिष्यवर्गाने विविध अभंग, भावगीते, नाट्यगीते सादर केली. ही गाणी सादर होत असताना समोर बसलेल्या आजीआजोबांपैकी अनेकजण गाणी गुणगुणत होते. त्यानंतर काही आजोबा आणि आजींनीही गाणी सादर केली. योगायोगाने यावेळी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील सरिताच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेली अभिनेत्री प्राजक्ता वाडये उपस्थित होती. तिनेही एक धमाल गाणे सादर केले. त्यामुळे या कार्यक्रमाला आगळीच रंगत आली.
या कार्यक्रमात हर्ष नकाशे, शुभम राणे, संपदा दुखंडे, आदिती लवेकर, सारा शेटये, सायली तांबे, प्रतीक्षा कोयंडे, मृण्मयी पांचाळ यांनी गाणी सादर केली. पखवाजसाथ अंकित घाडी याने केली. हार्मोनियम साथ सुजय मालंडकर याने तर तबलासाथ सुबोध मालंडकर याने केली.
स्वरांगण संगीत विद्यालयाच्या वतीने यावेळी वृद्धाश्रमातील आजीआजोबांना फळवाटप करण्यात आले. एकूणच दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)