सिंधुदिशाची शैक्षणिक व सामाजिक संस्था यांची आदिवासी बांधवा सोबत दिवाळी साजरी....
बांदा | राकेश परब : सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्था दरवर्षी दिवाळी अशा कुटुंबांसोबत साजरी करते ज्यांच्याकडे दिवाळीचा फराळ क्वचितच बनतो किंवा कधीच बनतही नाही. यावर्षीही अशाच एका गावांची निवड केली. गावांची निवड करण्याची जबाबदारी पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील समाजसेवक केसरीनाथ केणी व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील साहेब यांनी प्रत्यक्ष पाहून त्यानंतर पालघर मोखाडा तालुक्यातील बलध्याचा पाडा भागातील कुटुंबांचा माहिती घेऊन ८६ कुटुंबांची यादी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते चंदर गायकवाड यांच्या सहकार्याने तयार केली. फराळाचे किट देण्याचा निर्णय झाला. कारण, कोरोना काळात ज्यांचे हातावर पोट होते अश्या बऱ्याच लोकांच्या कामावर गदा आली होती. फराळ घरी बनवुन वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजन करण्यात आले.
सकाळी सर्व दिलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी येत प्रवास करत संस्थेचे सदस्य पालघर मधील शेवटच्या टोकावर वसलेल्या दुर्गम भागातील मोखाडा येथील बलध्याचापाडा गावा मध्ये ५ तासाचा प्रवास करत पोहचले. थकवा आला होता पण तेथे पोहोचल्यावर समोरचं आदिवासी बांधवांनी प्रेम व स्वागत खुप छान केले. सर्वजणांनी कीट वाटप केले. त्या लोकांशी थोडा संवाद साधून आम्ही कीट वाटले. कुटुंबाची नाव घेऊन त्यांना पुढे बोलवून मग कीट देण्यात आले. आणि साधारण तासाभरात या संस्थेंने एका पाड्यातील ८६ कुटुंबाना फराळाचे कीट बनवून वाटले.
कुठल्याही कामाचं योग्य नियोजन असेल आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली की ते काम सहज पूर्ण होतं. या कीटमुळे या ८६ कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झालेले पदाधिकारी रुपेश परब, राजेश सावंत, विलास राऊळ सर,संजय गवस,रजत गवस, विलास गवस, मुकेश नाईक , संतोष ओटवणेकर, सुनील जाधव ,दिपक सावंत सर, समिक्षा ओटवणेकर . सदर हा फराळ बनवण्यासाठी सौ.वर्षाताई जाधव, सौ.मयुरीताई नाईक, सौ.स्नेहाताई कुळये, कु.भक्ती नारूलकर यांचे सहकार्य लाभले.व उपक्रमात आर्थिक मदत करणाऱ्या संस्थेच्या सर्व देणगीदार व शुभचिंतकाचे आभार संस्थेचे अध्यक्ष रूपेश परशुराम परब यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)