‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़.
‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपक्रम.
मालवण | प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मालवणात ‘आशीर्वादाचा दिवा – एक दीप सेवा संकल्पाच्या नावे’ हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, राजकोट येथे गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी दीप प्रज्वलित करून सेवा, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प करण्यात आला. यावेळी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘सेवेची २५ वर्षे, सुशासन, गरीब कल्याण आणि राष्ट्रनिर्माण’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ‘विकसित भारताचा’ संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी मालवण शहर प्रभारी पंकज सादये, महिला मोर्चा अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, स्विकृत नगरसेवक तोरसकर आणि युवा मोर्चा अध्यक्ष व नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर सेवा कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)