ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू.

Article image

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत.


सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 


डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी असून, प्रशासकीय सेवेत आल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. 



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स