ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
मसुरे येथे शिवसेनेची बि. एल. ए. संदर्भात आढावा बैठक संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे येथे शिवसेनेची बि. एल. ए. संदर्भात आढावा बैठक संपन्न.

मसुरे येथे शिवसेनेची बि. एल. ए. संदर्भात आढावा बैठक संपन्न.

Article image

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे येथे 'मसुरे विभाग शिवसेना' पक्षाच्या वतीने बी. एल. ए. ( बूथ लेव्हल एजंट्स) संदर्भात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. छोटू ठाकूर यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या बैठकीत अध्यक्ष काका कुडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी बी.एल. ए. ची गरज, मतदार यादी, पुनरीक्षणातील भूमिका, पक्ष संघटनेसाठी त्याचे महत्त्व तसेच आगामी पक्ष धोरणे आणि त्याचे गांभीर्य समजावून सांगितले. सर्व बी. एल. ए. यांनी सतर्क राहून कामकाज करावे असे त्यांनी आवाहन केले.


यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष संग्राम साळसकर, तसेच तालुकाध्यक्ष विनायक बाईक यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा विविध प्रश्न उपस्थित करून कामकाज संदर्भात माहिती करून घेतली. 


या बैठकीला पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, शिवसेनेचे युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, तालुकाप्रमुख विनायक बाईक, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, विभागीय अध्यक्ष संतोष पालव, पप्पू मुळीक, वेरली सरपंच धनंजय परब, तात्या हिंदळेकर, शिवाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, जितेंद्र परब, सतीश मसुरकर, बाबू येसजी, सचिन पाटकर, किशोर ठाकूर, मनोज पालव, महेश बागवे, अनंत भोगले, निलेश मसुरकर, तात्या परब, राजाराम मुळीक, किरण पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बी. एल. ए. उपस्थित होते. छोटू ठाकूर आणि संतोष पालव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 592

लोकप्रिय टॅग्स