सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
खासदार नारायण राणे व सौ. नीलमताई राणे यांच्याकडून दिवंगत सरोज परब कुटुंबियांना धीर देत सांत्वनपर भेट.
मसुरे | झुंजार पेडणेकर : कोकणचे ज्येष्ठ वरीष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांनी मसुरेतील श्री. शिवाजी परब व दिवंगत सरोज परब यांच्या निवासस्थानी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष सौ. सरोज परब यांचे शनिवारी २९ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी, सरोज ताईंच्या निधनाने जिल्ह्याच्या विकासात्मक राजकीय वाटचालीत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे सांगितले. सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे आणि आम्ही परब कुटुंबाच्या या संकटात सहभागी आहोत असे यावेळी सांत्वन करताना खासदार नारायण राणे म्हणाले.
यावेळी, सौ. नीलमताई राणे यांनी, दिवंगत सरोज परब यांचे पती श्री. शिवाजी परब, कन्या मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, सुपुत्र उद्योजक राहुल परब यांना धीर देत सांत्वन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. सदस्य क्षमा हडकर, उपसभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, डॉ. सुधीर मेहेंदळे, सूर्यकांत फणसेकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, संदीप हडकर, राजेश गावकर, पंढरीनाथ मसुरकर, जगदीश चव्हाण, अजय प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, रोहेश गावकर, गणेश परब, पुरुषोत्तम शिंगरे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत सरोज परब यांच्या निधनाबद्दल सांत्वनपर शोक व्यक्त केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)