ताज्या बातम्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'मालवण - बोरीवली' व 'मालवण - पणजी' बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करुन सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन. ध्वनीक्षेपक वापरण्याच्या निर्बंधातून सवलत आणि निर्धारित ध्वनीमर्यादांचे पालन करणे बंधनकारक. रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीतील २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे वितरण. वैश्यवाणी समाजातील विद्यार्थी, युवक, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच ओबीसी प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार. 'जामीन हा नियम आणि तुरुंग हे अपवाद,' ..तरी ही केस अपवादाच्या कक्षेतच.....! संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे २६ ऑगस्ट रोजी ८ तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी. ईद - ए- मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करण्याचे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन. जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ. गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारिणी जाहीर.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'मालवण - बोरीवली' व 'मालवण - पणजी' बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'मालवण - बोरीवली' व 'मालवण - पणजी' बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 'मालवण - बोरीवली' व 'मालवण - पणजी' बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन.

Article image

आगार व्यवस्थापकांच्या आश्वासक भूमिकेची शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांची माहिती. 



मालवण : मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी 'मालवण - बोरीवली' आणि 'मालवण - पणजी' या बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी मालवण आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले. सदर बससेवा बंद असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे ह्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


२९ ऑगस्ट २०२६ रोजी शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी व सहकारी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनाला, मालवण डेपो मॅनेजर यांनी सकारात्मकता दर्शवत १ सप्टेंबर पासून मालवण - पणजी बससेवा पूर्ववत सुरू करत असल्याचे सांगितले. तसेच मालवण - बोरीवली बस सेवेसाठी देखील प्रयत्न करू असे आगार व्यवस्थापकांनी आश्वासित केले असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी दिली आहे. 


यावेळी शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांच्यासह उप शहरप्रमुख किरण चव्हाण, गणेश चव्हाण, सुरेश मडिये, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स

ताज्या बातम्या