ताज्या बातम्या
हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार.

सिंधुदुर्ग महाविद्यालयीन एनसीसी सिनियर अंडर ऑफिसर रुपाली करंगुटकर दिल्लीतल्या 'ऑल इंडिया थलसेना' कॅम्पमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार.

Article image

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांची रुपाली करंगुटकर यांच्या निवडीबद्दल माहिती. 


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयीन राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर यांची दिल्ली येथे ३१ ऑगस्ट २०२६ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड झाली आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी सिनिअर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर यांच्या निवडीबद्दल विशेष माहीती दिली आहे.

Article image

रुपाली करंगुटकर यांचा '58 महाराष्ट्र बटालियन, ओरस' यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर येथे आयोजित विविध प्रशिक्षण व निवड शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग होता. त्यांना "58 महाराष्ट्र बटालियन'चे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक तसेच बटालियनमधील इतर आर्मी ऑफिसर्स यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.  

Article image

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे सिनिअर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.  


रूपाली करंगुटकर यांच्या या निवडीबद्दल स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी तिचे अभिनंदन केले असून दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच NCC विभागातील सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींनीही सिनिअर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर यांच्या यशाची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, सहसेक्रेटरी संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, संचालक ॲड. समीर गवाणकर, डॉ. शशिकांत झांटये, डॉ. रामचंद्र काटकर, महादेव पाटकर, राजेंद्र खांडाळेकर, शैलेश पावसकर, माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी रूपालीचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनीही रूपालीच्या या उल्लेखनीय यशाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 522

लोकप्रिय टॅग्स