ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
ओझर विद्यामंदिर प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओझर विद्यामंदिर प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात.

ओझर विद्यामंदिर प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात.

Article image


योग अभ्यासक शिक्षक प्रवीण पारकर यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डि. डि. जाधव यांनी योगासनांची महती समजावली.

Article image

मालवण : मालवण तालुक्यातील उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेचे मुख्याध्यापक डि. डि. जाधव यांनी योग दिनाचे महती स्पष्ट करताना, योगासनांचे मानवी शरीर व मनाला होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावले. 

Article image

योग अभ्यासक शिक्षक प्रवीण पारकर यांनी विद्यार्थ्यांकडून व सर्व कर्मचाऱ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करवून घेतली. त्यामध्ये पद्मासन, वज्रासन, त्रिकोणासन, चक्रासन, भुजंगासन, ताडासन व सूर्यनमस्कार असे योगासनांचे विविध प्रकार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी केले. 

योगासने आणि कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी इत्यादी प्राणायामाचेही प्रकार केले. शेवटी शासनाच्या मैत्री उपक्रमांतर्गत १० मिनिटे आनापान ध्यानधारणा घेतली. 

   

जागतिक योग दिन कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे शिक्षक ए. ए. शेर्लेकर, पांडुरंग राणे, शिक्षकेतर कर्मचारी पी. व्ही. खोडके, रविराज जाधव आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स