ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन राष्ट्र समर्पित क्रांतिकारकांच्या कृतज्ञतेत साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन राष्ट्र समर्पित क्रांतिकारकांच्या कृतज्ञतेत साजरा.

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन राष्ट्र समर्पित क्रांतिकारकांच्या कृतज्ञतेत साजरा.

Article image

प्रशालेच्या समाज शास्त्र विभागाचे विशेष आयोजन तर इतिहास अभ्यासक भूषण साटम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान.


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा मालवण येथे क्रांती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. प्रशालेतील समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ह्या विशेष कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव व्हावी हा हेतू होता. इतिहास अभ्यासक भूषण साटम हे ह्या व्याख्यानाचे व्याख्याते होते.



यावेळी मार्गदर्शन करताना भूषण साटम यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना, ब्रिटिशांच्या जुलमी शृंखलांत जखडलेल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी प्राणाची आहुती देत संघटन, कठोर राष्ट्रप्रेम, एकात्मता, शिस्तपालन, वज्रनिश्चय, गुरुजनांचा आणि आपल्या संस्कृतीचा, धर्माचा अभिमान या घटकांचे स्मरण करुन देत त्यांच्या कृतज्ञतेची अत्यावश्यकता तसेच माहिती दिली. आज भारत देश पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम बनवायचा असेल क्रांतिकारकांनी आचरणात आणलेले गुण आचरणात आणावेत असे आग्रहपर आवाहन देखिल व्याख्याते भूषण साटम यांनी केले. 


यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, कट्टा केंद्रप्रमुख गौरव नाईक मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, पालक शिक्षक संघाचे सदस्य गणेश वाईरकर, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख एकनाथ राऊळ, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर उपस्थित होते.

   


यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेचे सहाय्यक शिक्षक किसन हडलगेकर यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागाचे प्रमुख एकनाथ राऊळ यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स