मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी दिन साजरा.
मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी दिन साजरा.
राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तसेच मालवण नगरपरिषद नगरसेवक मंदार ओरसकर आणि नगरसेवक ललित चव्हाण यांचा गौरव.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर, मालवण तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड भुतेलो आणि मान्यवर व खेळाडुंची उपस्थिती.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने भंडारी हायस्कूल पटांगणावर कबड्डी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तसेच मालवण नगरपरिषद नगरसेवक मंदार ओरसकर आणि नगरसेवक ललित चव्हाण यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. युवा वयात, क्रीडा क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात यश मिळवून, नगरसेवक पदाची जबाबदारी भूषवीत असल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह नितीन हडकर, मालवण तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड भुतेलो, रिद्धी हडकर, राजेश बांदकर, मिथिल हिंदळेकर, राखी हडकर, चंदन मांजरेकर यांच्यासह कबड्डीप्रेमी, खेळाडू आणि क्रीडारसिक उपस्थित होते.
कार्यक्रमात कबड्डी खेळाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. युवकांनी कबड्डीकडे अधिकाधिक वळावे आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर मालवणचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)