पोलिस हवालदार अर्चना म्हात्रे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान.
पोलिस हवालदार अर्चना म्हात्रे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान.
मसुरे | प्रतिनिधी : नवी मुंबई पोलीस उप आयुक्त विशेष शाखा कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अर्चना जितेंद्र म्हात्रे यांचा भारत सरकार गृह मंत्रालय तर्फे महाराष्ट्र पोलिस उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यांनी २१ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. सेवा कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, सुरक्षा शाखा, गुन्हे शाखा या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.
त्यांना आजपावेतो केलेल्या सेवेत १३१ बक्षीस प्राप्त असून सदर कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना सन २०२१ सालचा पोलीस महासंचालक यांचे 'सन्मान चिन्ह' देऊन गौरविले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)