ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते डांगमोडे सुपुत्र पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांचा राष्ट्रपती पदक व अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते डांगमोडे सुपुत्र पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांचा राष्ट्रपती पदक व अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते डांगमोडे सुपुत्र पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांचा राष्ट्रपती पदक व अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सत्कार.

Article imageArticle image

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या डांगमोडे गावचे सुपुत्र, आणि बृहन्मुंबई येथे गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दिपक अनंत ठाकूर यांना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (गुणवत्ता पूर्ण सेवा ) जाहीर झाले आहे. तसेच २५ वर्ष अविरत सेवे बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे 'अती उत्कृष्ट सेवा पदक' सुद्धा त्यांना जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक आणि होमगार्ड दलातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना घोषित झालेल्या राष्ट्रपती पदक व सेवा पदकांची घोषणा १४ ऑगस्ट २०२६ ला झाली होती.

Article image


एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले ठाकूर हे १९९१ मधे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांच्या निष्कलंक, शिस्तबद्ध, उत्कृष्ट सेवा कामगिरीची दखल घेऊन यापूर्वी विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापूर्वी त्यांनी जुहू, ओशिवरा, कांदिवली पोलीस स्टेशनला काम केले आहे. २०१० साली त्याना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई पोलीस मुख्यालयात मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांनी त्यांचा कुटुंबासमवेत सत्कार करत अभिनंदन केले. डांगमोडे व परिसरातून त्यांची अभिनंदनपर प्रशंसा करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स