ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नशामुक्तीची शपथ.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नशामुक्तीची शपथ.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना नशामुक्तीची शपथ.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार, 'नशा मुक्त भारत अभियाना'च्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथील मायनाक भंडारी सभागृहात 'National Pledge Against Drug Abuse' (अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय प्रतिज्ञा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Article image


उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली तसेच यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शासनाच्या http://nashamukt.dosje.gov.in/ पोर्टलवर ई-शपथ घेण्याबाबत तसेच नशामुक्त मित्र म्हणून नोंदणी करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.


यावेळी मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी वराळे म्हणाल्या की, जागतिक स्तरावर अमली पदार्थांचा वाढता वापर देशातही पोहोचला असून युवा पिढीला या नशेने विळखा घातला आहे. भावी पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. महाविद्यालयीन तसेच शालेय स्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन याबाबत जनजागृती करावी. सुदृढ पिढी घडविण्यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, तहसीलदार चैताली सावंत, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समतादूत संग्राम कासले यांनी केले.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स