ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.

शाळांच्या यंदाच्या सुट्यांच्या तारखा जाहीर ; एप्रिलअखेर वार्षिक परीक्षा.


ब्यूरो न्यूज : यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना दिवाळीच्या ११ दिवस सुट्ट्या असणार आहेत. ५ ते १७ नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या असणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाने शाळांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे असणार आहेत.


चालू ऑगस्ट महिन्यात शाळांना शनिवारी स्वातंत्र्य दिनाची, १७ ऑगस्टला नागपंचमीची, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादची आणि २८ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी असणार आहे. या महिन्यात पाच रविवारीदेखील शाळांना सुट्टी असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नियमानुसार, शैक्षणिक वर्षात परीक्षेचे दिवस वगळून किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, अशी अपेक्षा आहे.


शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात मुख्याध्यापकांच्या अधिकारातील एक सुट्टी असेल. याशिवाय वर्षातील ५२ रविवारीदेखील शाळांना सुट्टी राहील. शैक्षणिक वर्षात कामाचे एकूण २३७ दिवस असतील. त्यात परीक्षेचे दिवसदेखील असणार आहेत.


यंदा मतदार पुनरीक्षण, जनगणना आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामामुळे बहुतेक शिक्षकांना अध्यापनासाठी कमी दिवस मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर २०२६ - २७ या शैक्षणिक वर्षातील शालेय विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलनंतरच घेतली जाणार आहे. १ मे रोजी परीक्षांचा निकाल जाहीर होऊन १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असणार आहे.


यंदाच्या सार्वजनिक सुट्ट्या खालील प्रमाणे आहेत.


ऑगस्ट : (स्वातंत्र्य दिन/पारशी दिन : १५ ऑगस्ट, नागपंचमी : १७ ऑगस्ट, ईद-ए-मिलाद : २६ ऑगस्ट, रक्षाबंधन : २८ ऑगस्ट).


सप्टेंबर : (१४ सप्टेंबर : गणेश चतुर्थी, १८ सप्टेंबर : गौरी पूजन, २५ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी).


ऑक्टोबर : (२ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती, ११ ऑक्टोबर : घटस्थापना, २० ऑक्टोबर : दसरा).


नोव्हेंबर : (५ ते १७ नोव्हेंबर : दिवाळी सुट्टी, २४ नोव्हेंबर : गुरुनानक जयंती).


डिसेंबर : (२५ डिसेंबर : नाताळ).


जानेवारी : (७ जानेवारी : वेळ अमावस्या, १४ जानेवारी : भोगी, १५ जानेवारी : मकरसंक्रांत, २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन).


फेब्रुवारी : (१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती).


मार्च : (६ मार्च : महाशिवरात्री, १० मार्च : रमजान ईद, २२ मार्च : धुलिवंदन, २६ मार्च : गुड फ्रायडे, २७ मार्च : रंगपंचमी).


एप्रिल : (७ एप्रिल : गुढीपाडवा, १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १५ एप्रिल : श्री राम नवमी, १८ एप्रिल : महावीर जयंती).


मे : (१ मे : महाराष्ट्र दिन).

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 517

लोकप्रिय टॅग्स