ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मुंबईतील संगीत नाटक महोत्सवात १३ ऑगस्टला' संगीत मत्स्यगंधा..!'
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मुंबईतील संगीत नाटक महोत्सवात १३ ऑगस्टला' संगीत मत्स्यगंधा..!'

मुंबईतील संगीत नाटक महोत्सवात १३ ऑगस्टला' संगीत मत्स्यगंधा..!'

Article image


सावंतवाडी येथील श्री परमेश्वर प्रॉडक्शनची निर्मिती आणि बाळ पुराणिक यांचे दिग्दर्शन.


सिंधुदुर्ग : मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर संगीत नाटक महोत्सव २०२६ मध्ये सावंतवाडी येथील श्री परमेश्वर प्रोडक्शन निर्मित संगीत मत्स्यगंधा हे नाटक गुरुवार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सादर होणार आहे. कै. प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन बाळ पुराणिक यांनी केले आहे. नाटकाचे मूळ संगीत कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे असून नाटकाला स्वप्निल गोरे यांनी संगीत मार्गदर्शन केले आहे. 


या नाटकात स्वप्निल गोरे, केतकी सावंत, उमा जडये , गुरुप्रसाद चिटणीस, गणेश दीक्षित, तेजस प्रभूदेसाई, शुभम परब आणि बाळ पुराणिक या सर्व स्थानिक कलाकारांचा सहभाग असून साथसंगत प्रसाद शेवडे (ऑर्गन), नीरज भोसले (तबला) हे करणार आहेत. नाटकाला प्रकाशयोजना अभिषेक कोयंडे, पार्श्वसंगीत गणेशप्रसाद गोगटे, रंगभूषा संजय जोशी तर वेशभूषा

सौ. वैभवी पुराणिक व प्राजक्ता राणे करणार आहेत.


चार दिवसांच्या या नाट्यमहोत्सवाला सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. मुंबईतील सर्व नाट्यरसिक तसेच सिंधुदुर्गातील मुंबईत रहाणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या मित्रमंडळींसह मोठ्या संख्येने या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहून आम्हा सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9422436147 हा क्रमांक उपलब्ध आहे अशी माहिती मिळत आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स