ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

Article image

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ९ ऑगस्ट २०२६ रोजी "श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी'च्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. 


कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सन २०२५ - २०२६ या आर्थिक वर्षाच्या नफा तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षात झालेल्या जमाखर्चास मान्यता देण्यासह पुढील वर्षात घेण्यात येणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, साहित्य संमेलनांसह दरवर्षी होणारे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.‌ 


याप्रसंगी जिल्हा सचिव संतोष सावंत, नकुल पार्सेकर, उषा परब, सुभाष गोवेकर, सहसचिव विनायक गांवस, विठ्ठल कदम, भरत गावडे, सुस्मिता चव्हाण, विजय देसाई, मेघना राऊळ, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, अभय नेवगी, संतोष पवार, प्रा. गणपत शिरोडकर, अरूण पणदूरकर, प्रा.एस. एन. मुक्कनवार, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर, मीरा कासार आदी उपस्थित होते. अभिमन्यू लोंढे यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स